कोरोना विस्फोट…. आज तालक्यात 267 पॉझिटिव्ह

टाकळी ठरले हॉटस्पॉट एकाच दिवशी 70 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 4 मे रोजी तालुक्यात तब्ब्ल 267 रुग्ण आढळून आले. पहिल्या आणि दुस-या लाटेतील हे एकाच दिवशी आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 74 पॉझिटिव्ह आलेत तर ग्रामीण भागात 175 रुग्ण आढळून आले आहे. यातील टाकळी या एकाच गावात तब्बल 70 रुग्ण आढळलेत. तर 18 रुग्ण इतर ठिकाणाचे आहेत. आज 91 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

वणी शहरात आलेल्या 74 रुग्णांमध्ये ओमनगर व जैन ले आऊट येथे सर्वाधिक 6-6 रुग्ण आढळलेत तर गुरुनगर, बॅक कॉलनी येथे प्रत्येकी 5 रुग्ण आढळून आलेत. कनकवाडी व सिंधी कॉलनी येथे प्रत्येकी 4 रुग्ण, प्रगती नगर, भोंगळे ले आऊट, रविनगर येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळलेत. रंगारीपुरा, विठ्ठलवाडी, आदर्श कॉलनी, गुरवर्य कॉलनी, सुभाषचंद्र बोस चौक, मोमिनपुरा येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर इंदिरा चौक, रंगनाथ नगर, लक्ष्मी नगर, रतन ऑईल मिल, देशमुखवाडी, जनता शाळे जवळ, शास्त्री नगर, आवारी ले आऊट, विद्यानगरी, मनिष नगर, भगतसिंग चौक, स्नेह नगर, माळीपुरा, आनंद नगर, तेली फैल, बेलदारपुरा, सानेगुरुजी नगर, नारायण निवास, एकता नगर, शिवाजी चौक, ढुमे नगर, राजीव गांधी चौक येथे प्रत्येक 1 रुग्ण आढळला आहेत.

ग्रामीण भागात आज तालुक्यात टाकळी येथे सर्वाधिक 70 रुग्ण आढळले. तर एसकेके कॅम्प गोवारी येथे 14, गणेशपूर येथे 12, घोन्सा 8, चिखलगाव, वाघदरा, उमरी येथे प्रत्येकी 5, भालर कॉलोनी, शिंदोला प्रत्येकी 4, कोलार पिंपरी, सावरला, भांदेवाडा, मजरा येथे प्रत्येकी 3, कोलेरा, ब्राह्मणी, राजूर, नांदेपेरा, पुनवट, बेलोरा, परमडोह, मंदर, भालर येथे प्रत्येकी 2, निलापूर, कोना, केशवनगर (वेळाबाई), दहेगाव, कैलाशनगर, सुकनेगाव, कुरई, गोवारी पार्डी, नायगाव, तेजापूर, लालगुडा, रासा, वारगाव, वडगाव, कोना, बोदाड, वांजरी, चिंचोली, वीरकुंड येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले. तर चंदपूर येथील 4, कुचना 1, झरीतालुका 5 आणि मारेगाव तालुक्यातील 8 रुग्ण वणीत पॉझिटीव्ह आलेत.

आज यवतमाळ येथून 617 अहवाल प्राप्त झालेत. यात 217 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. याशिवाय आज 317 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 50 पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 178 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. आज 91 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 868 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 39 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 787 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 42 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 3738 रुग्ण आढळून आलेत. यातील 2810 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

कोरोना निर्मुलन मोहीम हाताळण्यात सर्वच राजकीय नेते अपयशी

समाजसेवक गणेश सुंकुरवार यांचे निधन

Leave A Reply

Your email address will not be published.