‘युग’च्या मदतीला सरसावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरू
हाण रद्दा गृपची 45 हजारांची तर वणीच्या सायकल ग्रुपची 11 हजारांची मदत
तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील चिमुकल्या युगला अगदी बालवयातच किडनीच्या कॅन्सरने ग्रासले. त्याच्यावर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट मध्ये उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचार करणे जिकरीचे झाले आहे. म्हणून ‘वणी बहुगुणी’वर शिंदोल्याच्या कॅन्सरग्स्त चिमुकल्या युगला हवा मदतीचा हात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. तसेच ‘लोकवाणी जागर’ या पोर्टलवरूनही मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कॅन्सरग्रस्त युगच्या मदतीला मानुसकी पुढे सरसावली आहे. बुधवारी सायकलींग गृपतर्फे 11 हजारांची, यवतमाळ बँकेतर्फे 4.5 हजारांची तर शहरातील सुप्रसिद्ध हाण रट्टा या व्हॉलीबॉल गृपतर्फे तब्बल 45 हजारांची मदत करण्यात आली आहे. तर अनिल आसुटकर यांनी 1 हजार रुपयांची मदत केली आहे. परिणामी युगच्या आईवडिलांना दिलासा मिळाला आहे.
वणी तालुक्यातील शिंदोला येथील चार वर्षीय युग कैलास मालेकर या बालकाला सहा महिन्यांपूर्वी किडनीचा कॅन्सर झाला. एकुलत्या चिमुरड्याला कॅन्सरची बाधा झाल्याने कुटूंबियांचे अवसान गळाले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शिंदोलावासीयांनी आर्थिक मदत करून युगला नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे उपचारासाठी मदत केली. परंतु उपचारावरील खर्च मोठा असल्याने ‘वणीबहुगुणी न्युज पोर्टल’च्या बातमीच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले. तसेच वणीतील पत्रकार परशुराम पोटे यांनी सुद्धा या कामात पुढाकार घेतला.
त्यानुसार यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा मारेगाव येथील शाखा व्यवस्थापक गीता गेडाम, लेखापाल संतोष पाचभाई, रोखपाल प्रवीण गारघाटे, लिपिक तुषार बलकी, विनय पिदूरकर, पूजा गौरकार, सुशील शेंडे, प्रवीण मोहितकर यांनी 4,500 रुपयांची मदत केली.
तर वणी येथील सायकल ग्रुप युवा मित्र परिवाराचे सदस्य विनोद घुंगरूड, देवेंद्र खरवडे, जगदीश ढोके, छगन कुचनकार, प्रवीण भोयर, प्रा.विकास जुनगरी, छगन गारघाटे, विशाल कुंभारे, मंगेश रासेकर, संदेश पानघाटे, हरीश पिदूरकर, संतोष ढुमणे, पांडुरंग मोडक, सचिन पिंपळकर, सचिन ढोके, विजय चव्हाण, डॉ. जगन जुनगरी, प्रदीप बोरकुटे, जगदीश नागपुरे, मंगेश ताजने, डॉ. चंद्रकांत झाडे, विकास जेणेकर यांनी रोख 11,000 रुपयांची मदत युगच्या वडिलांकडे सोपवली.
हाण रट्टा गृपचे शहरात कौतुक, तब्बल 45 हजारांची मदत
वणीतील जय हो हानरट्टा क्रिडा मंडळा या व्हॉलीबॉल गृपतर्फे युग ला 45 हजारांची मदत करण्यात आली. आज युगच्या वडिलांकडे टिळक चौकात ही मदत सुपुर्द करण्यात आली. सामाजिक बांधीलकी जपून हाण रट्टा गृपने जी मदत केली आहे. त्यासाठी संपूर्ण शहरात त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे व राजू तुराणकर यांची प्रमुख उपसथिती होती तसेच यावेळी योगेश खिवंसरा, रवि वांढरे, संतोष पाचभाई, महेश पहापळे, सिद्धीक रंगरेज, मिलिंद बोढाले, प्रविण वासेकर, नीलेश दासरवार, विलास गौरकार, सुदीप गौरकार, विनोद घुंगरुड, भुपेंद्र देरकर, ललित लांजेवार, राजकुमार तुराणकर, अजिंक्य शेंडे, तुषार वाघमारे, राजूभाऊ फरताडे, महादेव पानघाटे, सुधीर काळे, दिपक रासेकर, शंकर देरकर, जितूभाऊ जांगडा, सुनिल डोंगरकर, मधू कोंगरे, सुधीर काळे, किशोरभाऊ, झाडेभाऊ यांची उपस्थिती होती.
वणीकरांनी जर भरभरून मदतीचा ओघ सुरू ठेवला असला तरी ही लढाई कठिण आहे. पुढे आणखी आर्थिक मदत लागणार आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तीेंनी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना कुणाला मदत करायची असेल त्यांना या खाते क्रमांकावर मदत करता येऊ शकते. अधिक माहितीसाठी वणी बहुगुणीशीही आपण संपर्क साधू शकता.
(कैलास वारलू मालेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा शिंदोला. खातेक्रमांक 005411002100647 आयएफएससी कोड UTIBOSYDC 54)
या क्रमांकावर मदत पाठवण्याची विनंती आहे. संपर्क क्रमांक: 6026626308
हे देखील वाचा:
Comments are closed.