कानडा येथील शाळेतील टीव्ही संच बनले शोभेची वास्तू

वीज कापल्यामुळे सर्व संच पेटीबंद, विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित

भास्कर राऊत, मारेगाव: कानडा येथील जि. प. शाळेतील सुरु असलेली वीज मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना टीव्हीच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण बंद असून टीव्ही संच केवळ शोभेची वस्तू बनलेली आहे. दरम्यान अनेक महिन्यांपासून डिजिटल शिक्षण बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे याविषयाकडे नेते, लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करताना दिसत आहे.

Podar School 2025

ग्रामीण भागामध्येंही विद्यार्थ्यांनी अपडेट राहावे म्हणून तालुक्यातील अनेक शाळा या डिजिटल करण्यात आल्या. शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावे यासाठी शासनस्तरावरून शाळेला डिजिटलचे स्वरूप देण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये हा यामागचा उद्देश होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

येथील मुख्याध्यापक हे पेनड्राईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य करीत होते. परंतु सद्य परिस्थितीमध्ये या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे. कारण कानडा जिल्हापरिषद शाळेतील विजपुरवठा कापला गेला असल्याने हा डिजिटलचा संच बंद पडलेला आहे.

गावातील नेते, कर्ते, पुढारी यांचे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे. एरवी गावातील वेगवेगळ्या विषयावर बोलणारे पुढारी यावर मूग गिळून असल्याने विद्यार्थी मात्र डिजिटल शिक्षणापासून वंचित राहत आहे.

मध्यान्ह भोजनाचीही समस्या – मुख्याध्यापक
माझी जेव्हा बदली कानडा या गावाला झाली त्यावेळेस येथील विजेचे कनेक्शन हे कापलेले होते. आमच्या शाळेमध्ये तेवढी रक्कम नसल्यामुळे नवीन विजेचे मीटर घेऊ शकलो नाही. तसेच येथे केवळ एकच शिक्षक असून खिचडी शिजवायला देखील गॅस नाही
लोमेश्वर उमरे, मुख्याध्यापक कानडा
====================
वीज जोडणीसाठी प्रयत्न करू – सरपंच
शाळेची वीज तोडल्यानंतर ग्रामपंचायतने अंगणवाडी येथे नवीन वीज मीटर जोडून दिले. शाळेला अंगणवाडी येथून वीज जोडणी दिली. त्यानंतर या मीटरवर मोठ्या प्रमाणात बील आल्याने अंगणवाडी आणि जि. प. शाळा यांनी बील भरण्यासाठी नकार दिला. त्यामुळे मागील दीड वर्षांपासून येथील वीज बंद आहे. आम्ही आता यासाठी प्रकर्षाने प्रयत्नरत असून लवकरच वीज जोडणीसाठी प्रयत्न करून खंडित करण्यात आलेला विजपुरवठा पूर्ववत करू.
– सौ. मनीषा पवन ढवस
सरपंच, गटग्रामपंचायत कान

हे देखील वाचा: 

Comments are closed.