सुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड
सलग तिस-यांदा मिळाला बहुमान, मान्यवरांच्या हस्ते सत्कार
जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता सुनिल शामरावजी नागपुरे यांनी MDRT हा बहुमान प्राप्त झाला आहे. सलग तीनदा त्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांना अमेरिका येथे होणा-या मिलियन डॉलर राउंड टेबल कॉन्फरन्ससाठी जाण्याची संधी मिळाली आहे.
वेळेआधीच टारगेट पूर्ण
MDRT हा बहुमान मिळण्यासाठी वर्षभरासाठी एक टारगेट दिले जाते. यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर आहे. मात्र अशा गंभीर काळातही सुनिल नागपुरे यांनी हे टारगेट दिलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण केले, हे विशेष.
त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल वणी शाखेव्दारे त्यांचा सन्मान करण्यात आला. शाखाधिकारी श्री झलके, विकास अधिकारी विटाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शाखेतील सर्व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात. यावेळी श्री झलके आणि श्री विटाळकर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुनिल नागपुरे यांचा अल्प परिचय
शहरातील पद्मावती नगरी येथील रहिवाशी असलेले सुनिल शामरावजी नागपुरे हे एलआयसी या कंपनीचे परिसरातील एक सुपरिचित विमा अभिकर्ते आहेत. MDRT हा बहुमान त्यांनी सलग तीन वेळा प्राप्त केला आहे. याशिवाय 11 वेळा शतकवीर होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला आहे. सीएम क्लब मेंबर व अतिशिघ्र शतकवीर होण्याचा मान देखील त्यांना प्राप्त झाला आहे
एमडीआरटी बहुमान काय आहे ?
आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. या राउंड टेबल कॉन्फरंससाठी जगभरातील विमा एजेंट्स सहभागी होतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. यावर्षीच्या राउंड टेबल कॉन्फरन्सला सहभागी होता येणं हा एक बहुमान समजला जातो. सुनिल शामरावजी नागपुरे यांना हा बहुमान यावर्षी प्राप्त झाला आहे. याआधीही त्यांना दोनदा हा बहुमान मिळाला आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: