नियमित व माजी विद्याथ्र्यांच्या परीक्षा आवेदनपत्रे स्वीकारण्याच्या तारखेत वाढ

उन्हाळी 2020 च्या सत्रपद्धती व वार्षिक पद्धती अभ्यासक्रम

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये तसेच विद्याथ्र्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे उन्हाळी 2020 च्या सत्रपद्धती व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमांच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच माजी विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्रे स्वीकारण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी 2020 परीक्षेसाठी अद्यापपर्यंत परीक्षा आवेदनपत्रे भरली नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 7 ते 12 सप्टेंबर, 2020 पर्यंत आपले परीक्षा आवेदनपत्रे हार्ड कॉपीमध्ये संबंधित महाविद्यालयामध्ये मूळ परीक्षा शुल्कासह (विलंब शुल्क न आकारता) जमा करावेत. विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्रे पोस्टाने किंवा व्यक्तीश: विद्यापीठात स्वीकारले जाणार नाहीत.

सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्याबाबत विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व पदव्युत्तर शैक्षणिक विभागाचे विभागप्रमुख यांना पत्राद्वारे कळविले आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.