शिरपूर पोलिसांनी पकडला कोळसा तस्करी करणारा ट्रक

दोघांना अटक, 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत आबई फाटा ते कोरपना रस्त्यावर अवैधरित्या कोळसा घेऊन जाणारं आयशर वाहन शिरपूर पोलिसांनी पकडले. गुरुवार 23 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आयशर (MH28T1676) व त्यामध्ये भरलेला अंदाजे 5 टन कोळसा ज्याची किंमत अंदाजे 50 हजार रुपये जप्त करून वाहन चालकास अटक केली आहे. या प्रकरणी ट्रक चालक विशाल वैदय व इरशाद खान इकबाल खान या दोघांना अटक करण्यात आली.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले याना शिंदोला मार्गे एका वाहनात अवैध कोळशाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीवरून शिरपूर पोलिसांनी आबई फाटा जवळ सापळा रचला. रात्री 12 वाजता दरम्यान शिंदोला मार्गाने येणाऱ्या आयशर ट्रकला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकाने ट्रक कोरपना मार्गावर वळविला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ठाणेदार सचिन लुले व पोलीस पथकाने पोलीस वाहनातून पाठलाग करत आबई ते कुरई दरम्यान ट्रक अडविला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात कोळसा भरलेला आढळला. ट्रक मध्ये कोळसा कुठून आणला व कुठे नेण्यात येत होते, याबाबत ट्रक चालक विशाल वैद्य याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ठाणेदार लुले यांनी ट्रक चालकास ताब्यात घेऊन कोळश्यासह ट्रक जप्त केला.

पोलीस ठाण्यात ट्रक चालकास विचारपूस केल्यास त्यांनी वाहन व कोळसा वणी येथील इरशाद खान नामक व्यक्तीचा असल्याचे सांगितले. ट्रक चालकाच्या कबुलीवरून पोलिसांनी ट्रक चालक विशाल वैदय व इरशाद खान इकबाल खान (35) रा. साईनगरी वणी विरुद्ध भादंविच्या कलम 379 (34) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी इरशाद खान यास शुक्रवारी वणी येथून अटक करुन दोघांना न्यायालयात हजर केले. त्यांना 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिसांनी ट्रक ज्याची किंमत 5 लाख रुपये व कोळसा ज्याची किंमत 50 हजार रुपये असा एकूण 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, व पोलीस पथकाने पार पाडली.

हे देखील वाचा:

Comments are closed.