शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, युवासेना व व्यापारी आघाडीचे निवेदन

चौकात वाहतूक शिपाई व होमगार्डची नियुक्ती करण्याची मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेत योग्य ती कारवाई करावी यासाठी शिवसेना प्रणीत युवासेना व व्यापारी आघाडीच्या वतीने ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा व व्यापारी आघाडीचे जिल्हा संघटक हिमांशू बत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.

शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोनाने ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे. वणी शहरात आधीच कोरोना वाढला असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. मात्र शहरात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहे. त्यामुळे या बाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेत चौकात होमगार्ड व वाहतूक शिपायाची नियुक्त करावी अशी मागणी युवासेना व व्यापारी आघाडी तर्फे करण्यात आली.

होमगार्ड व वाहतूक शिपायांची मदत घेणे गरजेचे – विक्रांत चचडा
प्रशासनातर्फे सोशल डिस्टसिंग ठेवणे व सॅनिटाझरचा वापर करणे या बाबत वारंवार सूचना दिल्या जात आहे. मात्र प्रशासनातर्फे कठोर भूमिका घेतली नसल्याने वाईन शॉप, बार तसेच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी काळजी घेण्यासह आता प्रशासनानेही आता कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. शहरात होमगार्ड आणि वाहतूक शिपायाची मदत घ्यावी.
– विक्रांत चचडा, युवासेना जिल्हा प्रमुख

अधिका-यांशी चर्चा करताना विक्रांत चचडा

निवेदन देताना सौरभ खडसे उप शहर प्रमुख, कुणाल लोणारे, बंटी सहाणी, ललित जुनेजा, सचिन पाटील, राजू गोलाईत, आकाश उईके, सोनु पठाण, खुशाल मेहता, अनुप चटप यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

सासुरवाडीहून परतताना जावयाचा भीषण अपघातात मृत्यू

शेतकरी नेते देवराव धांडे यांनी केले विषप्राषण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.