कोसारा येथील शेतमजुराला सर्पदंश

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोसारा येथील शेतमजुराला सर्पदंश झाल्याची घटना घडली. मनोहर वाघमारे असे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे नाव आहे. अमित भोयर यांच्या शेतात हा मजूर काम करतो. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती आहे.

रोज नेहमीप्रमाणे मजूर मनोहर वाघमारे शेतात कामानिमित्त गेला. रात्री शेतात झोपला असता, पहाटे ५ वाजताच्या सुमारास मनोहरच्या पायाला विषारी सापाने चावा घेतला. त्यानंतर मनोहर झोपेतून उठला व त्याला साप लावल्याचे लक्षात आले.
शेतमालक अमित भोयर याला फोन लावून सांगितले असता, गावातीलच खाजगी गाडी करून प्रथम मुकुटबन शासकीय दवाखान्यात आणले. परंतु प्रकृती बिघडल्याने वणी येथे हलविण्यात आले. .

छाती दुखणे कमी झाले, परंतु डोळ्याने कमी दिसत असल्याने तसेच उभे राहता येत नसल्याने व विष डोक्याकडे जात असल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सदर रुग्णाची संपूर्ण दवाखान्याची व्यवस्था करण्यासाठी नारायण गोडे यांनी मोठे परिश्रम घेतले..

Leave A Reply

Your email address will not be published.