शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

कापूस गाठोडे बांधताना घडली घटना

भास्कर राऊत मारेगाव: शेतामध्ये वेचून ठेवलेल्या कापसाचे गाठोडे बांधत असताना गाठोड्याखाली असलेल्या सापाने महिलेला दंश केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली असून महिलेचे नाव जिजाबाई पुरुषोत्तम माथनकर (60) आहे.

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. कापूस वेचणीही जोमात सुरू आहेत. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने घरी जेवढे लोकं आहेत तेवढेही जसे जमेल तसे कापूस वेचण्यासाठी जात असतात. यामध्ये आबालवृद्ध यांचाही समावेश असतो. अशातच आज दि. 28 ऑक्टोबरला जिजाबाई आपल्या कुटुंबियांसोबत कापूस वेचणीसाठी शेतामध्ये गेल्या होत्या. कापूस वेचून एका ठिकाणी तो गोळा करणे सुरू होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान वेचून ठेवलेल्या कापसाचे गाठोडे बांधायला गेल्या असता गाठोड्याच्या खाली दडून बसलेल्या सापाने जिजाबाई यांच्या हाताला चावा घेतला. जिजाबाई ओरडताच त्यांचा मुलगा भीमराव पुरूषोत्तम माथनकर आला आणि त्यांनी तत्काळ आईला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी जिजाबाई यांना मृत घोषित केले.

शेतीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणावर टंचाई असल्याने मिळेल त्या मार्गाने शेतीचे काम केल्या जात आहेत. कापूस वेचणीदरम्यान झालेल्या महिलेच्या मृत्यूने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments are closed.