तेरवीचा खर्च टाळून गोवारीच्या इद्दे परिवाराचा सामाजिक उपक्रम

वडिलांच्या तेरवीनिमित्त कोरोना योद्धांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध कबड्डीपटू महादेवराव इददे यांचे गेल्या काही दिवसांआधी निधन झाले. त्यांच्या तेरवीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा खर्च टाळत इद्दे परिवाराने सामजिक बांधीलकी जपत कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. दिनांक 13 फेब्रुवारीला गोवारी पार्डी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कोरोना महामारीच्या काळात सेवा देणारे शिंदोला परिसरातील डॉक्टर, आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. सोबतच इ-श्रम कार्ड नोंदणी शिबिरही यावेळी राबवण्यात आले.

तालुक्यातील गोवारी पार्डी या गावातील रहिवाशी असलेले महादेवराव सीताराम इद्दे हे एक सामाजिक कार्यकर्ते होते. ते माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणूनही त्यांची तालुक्यात ओळख होती. गेल्या काही दिवसांआधी त्यांचे निधन झाले. त्यानिमित्त तेरवीचा कार्यक्रम होता. मात्र त्यांचे पुत्र राजेंद्र इद्दे यांनी तेरवीच्या कार्यक्रमात होणार खर्च टाळून त्याच खर्चातून सामजिक उपक्रम राबिविण्याचे ठरविले. त्यांच्या प्रस्तावाला कुटुंबीय व नातेवाईकांनीही साथ दिली.

दिनांक 13 फेब्रुवारी ला स्व.महादेवराव सीताराम इद्दे यांचे स्मृती प्रित्यर्थ कोविड योध्दाचां सत्कार व मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देरकर होते. तर सुरेश वांढरे, किरण देरकर, कवरासे गुरुजी, लक्ष्मणराव इद्दे, लुकेश्वर बोबडे, पांडुरंग इद्दे, नरेंद्र बदखल, विठ्ठल बोंडे, निलेश पिंपळकर, हेमंत गौरकर, अजय कवरसे, गणेश जतेकर, जगदिश बोरपे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.रमेश जोगी, डॉ.किशोर चवणे, डॉ.अमोल चौधरी, डॉ.अशोक लोडे, डॉ.चांदेकर, गेडाम गुरुजी यांचा शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रजापती क्षीरसागर, नीलेश अल्सावार, कु.वर्षा घानोडे, चंदा मडावी, उज्ज्वला मडावी, संगीता मरस्कोल्हे, प्रतिभा डोंगे या अशा सेविकांना साडीचोळी व राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संजय देरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते एक उत्कृष्ट कुबड्डीपटू असल्याचे त्यांचे तालुक्यात अनेक चाहते होते. गोवारी गावच्या विकासामध्येही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी कायम मला सहकार्य केले असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष गेडाम, प्रस्तावित लक्ष्मण इद्दे यांनी केले. उपस्थितांचे आभार राजेंद्र इद्दे यांनी मानले. वडिलांचे सम्पूर्ण आयुष्य समाजसेवेत गेले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आम्ही कार्य करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा:

मारेगाव नगरपंचायत निवडणूक: काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.