सोयाबीनच्या बियाणांचे भाव वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल
गेल्या वर्षीपेक्षा 1000 ते 1500 रुपयांपर्यंत भाववाढ
पाटण: पेरणीचे दिवस जवळ आले आहे. शेतक-यांची आता पूर्वमशागत सुरू आहे. दरम्यान आता बि बियाणांची खरेदी देखील सुरू झाली आहे. मात्र सोयाबिनच्या 25 किलोच्या बियांणांच्या बॅगमागे सुमारे 1000 ते 1500 रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
यावरषी करिश्मा, 335 या वाणाचे जवळपास 1000 रु ते 1500 रु भाव वाढले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी 2500 हजारांच्या घरात असलेल्या या बियाणांचा भाव 3500 रु ते 3700 पर्यंत गेला आहे. दरम्यान महाबीज बियाणांची भाववाढ झाली नसल्याचे कळले आहे.
यावर्षी ऐन पीक काढणीच्या वेळी पाऊस आला. त्याचा परिणाम सोयाबिनच्या उत्पन्नावर झाला. यावर्षी सोयाबिनचे उत्पन्न कमी झाले. परिणामी यावर्षी बियाणे भाववाढ बऱ्याच प्रमाणात झालेली दिसून आली. बियाणांची भाववाढ लक्षात घेऊन कृषी विभागाने घरी असलेलेच सोयाबिनच्या बियाणांचा वापर करावा असे आवाहन केले होते.
हे देखील वाचा: