जब्बार चीनी, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त वणी शहर व तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे आहे. हा महोत्सव 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या महोत्सवांर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाद्वारे हा महोत्सव घेण्यात येत आहे.
दि. 19 फेबुवारी शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता वणी येथे शिवतीर्थावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याखाते प्रा. प्रवीण देशमुख यांचे ”शिवशाहीचा आदर्श आणि वर्तमान लोकशाहीचा परामर्श” या विषयावर व्याख्यान आहे. यासह “ओबीसी जनगणना-कायदेशीर लढाई” या विषयावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशक डॉ. ऍड. अंजली साळवे या मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर अध्यक्षस्थानी असून श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे स्वागताध्यक्ष राहणार आहे. कार्यक्रमात अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जिजाऊ ब्रिगेडच्या भारती राजपूत, पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुषार परळीकर, एलआयसीचे व्यवस्थापक प्रकाश झलके यांच्यासह डॉ.विवेक गोफणे, सुशांत माने, अॅड. नितीन जुनगरे, दिपक मत्ते, प्रा.दिलीप मालेकर यांची उपस्थिती राहणार आहे.
मोहदा व खांदला येथेही व्याख्यान
छत्रपती महोत्सवांतर्गत दि. 18 फेबुवारीला खांदला येथे तर दि. 20 फेबुवारी रोजी मोहदा येथे संध्याकाळी 6 वाजता प्रा. प्रवीण देशमुख यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. 21 आणि 22 फेबृवारीला सामुहिक जिजाऊ वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 23 फेबृवारीला कर्मयोगी गाडगेबाबा यांची सावित्रीबाई फुले वाचनालय, वणी येथे जयंती साजरी होणार आहे. तर दि. 24 फेबृवारी रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंती विर भगतसिंग अभ्यासिका, वणी येथे साजरी केली जाणार आहे.
शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचे मुल्य रुजावे या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि छत्रपती महोत्सव समिती- वणी, खांदला, मोहदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: