शासकीय निधीचा गैरवापर बंद करून विकास कामे करा

राजूर ग्रा. प.च्या माजी सरपंचाची सरपंच व सचिवांकडे मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : ग्राम पंचायतीला शासनाकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर थांबवून गावाच्या समस्यांकडे लक्ष द्या. असा आशयाचे निवेदन राजूर (कॉलरी) ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच प्रणिता मो. असलम यांनी ग्राम पंचायत सरपंच विद्या पेरकावार व ग्रामसेवक महेंद्र चहानकर याना दिले.

राजूर गावात वार्ड क्रमांक 2 मधील साई मंदिर जवळील उर्वरित रोडचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे. राजूर ग्रामपंचायत जवळ स्वतःचे ट्रॅक्टर असताना खाजगी व्यक्तीच्या ट्रॅक्टरद्वारे कचरा उचालण्यात येत आहे. वॉर्ड क्र. 1 इजारा येथे लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आले वाटर फिल्टर प्लांट नादुरुस्त अवस्थेत आहे तो दुरुस्त करावे. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची प्रकाशित यादी ग्रापं कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजूर येथील वॉर्ड क्र. 4 व 5 मधील रहिवासीयांना रेल्वे विभागाचे घरे खाली करण्याची नोटीस मिळाल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतने केलेल्या पाठपुराव्याची माहिती ग्रामसभा आयोजित करून नागरिकांना देण्यात यावी. तसेच गावातील इतर अनेक समस्यांकडे सरपंच व ग्रामसेवक यांनी जातीने लक्ष देऊन निराकरण करावे. अशी मागणी माजी सरपंच प्रणिता मो. असलम यांनी निवेदनातून केली आहे.

Comments are closed.