10 वीचा पेपर द्यायला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता

अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार

बहुगुणी डेस्क, वणी: घरून 10 वीच्या पेपरला सेंटरवर गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाली. सदर मुलगी ही अल्पवयीन आहे. तिच्या नातेवाईकांनी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली.

Podar School 2025

बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी (14) ही 10 व्या वर्गात असून ती वणीतील एका शाळेत शिक्षण घेते. तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ती वणीतील तिच्या नातेवाईकांकडे राहते. गुरुवारी दिनांक 7 मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे तिच्या मावस भावाने तिला मोटारसायकलने सेंटरवर सोडले व काही वेळाने तो सेंटरवरून निघून गेला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुपारी 12 वाजताच्या सुमारास शाळेच्या एका शिक्षकांनी तिच्या नातेवाईकांकडे फोन करून त्यांची बहिण लेक पेपरला गैरहजर असल्याचा निरोप त्यांनी दिला. तिच्या मावस भावाने शाळेत जाऊन चौकशी केली असता ती पेपरला आलीच नसल्याचे कळले. तिच्या नातेवाईकांनी वणीतील ओळखीच्या लोकांकडे तसेच तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली. मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही.

कुणीतरी फूस लावून पळवल्याचा मुलीच्या नातेवाईकांना संशय आला. त्यावरून त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला. दोन दिवसांनी सदर मुलगी ही आढळून आली.

Comments are closed.