विद्यार्थी सोडवतात व्हॉट्स ऍपवरून स्वाध्याय
अहेरअल्ली येथील जिल्हा परीषद शाळेचा अनोखा उपक्रम
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अहेरअल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शेतील १०० टक्के विद्यार्थी व्हाट्सअँप वर स्वाध्याय सोडवतात ज्यामुळे तालुक्यातील पहिलीच शाळा असल्याचे पहायला मिळाले आहे. जगात कोविड १९ ची महामारी आल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. शालेय विदयार्थी यांना ऑनलाईन शिक्षणाच्या डिजीटल अभ्यासा व्दारे जिद्दीने पुढे जाण्यासाठी व विद्यार्थीं चे नुकसान होऊ नये याकरिता व्हाट्सएपच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करण्यात आला. आणि पाहता पाहता त्याला प्रचंड यश आले आहे.
जि प उच्च प्राथमिक शाळा अहेरअल्ली येथील १०० % विद्यार्थ्यांचे नोंदणी झाली असून ते नियमित व्हाट्सएपच्या स्वाध्याय सराव करित आहे व सोबतच वर्ग ५ ,६ व ७ करिता असलेला महादीप स्पर्धा परीक्षा प्रश्नसंच सुध्दा नियमित सोडवत आहेत नियमित अभ्यासक्रम ऑनलाईन घुगल मिट च्या माध्यमातून पूर्ण करतात. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा मार्गदर्शन सुद्धा याव्दारे पूर्ण केलेले आहे . सर्व विदयार्थांना प्रत्यक्ष घरोघरी भेटीतून अभ्यास मार्गदर्शन चालू असून त्यांच्या अभ्यासातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे .
सदर अभ्यास करून घेण्यासाठी गावातील पालकांचा प्रचंड उत्साह आणि मदत होत आहे . ज्या मुलांना मोबाईलची अडचण आहे अशांची अडचण स्वतः शिक्षकांच्या व शिक्षिकेच्या मोबाईल मधून विद्यार्थी सोडवत आहेत .कोविड १९ च्या महामारीत विदयार्थाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद प्रयत्नरत आहेत .
या वर्षी सर्व विदयार्थींचे वार्षिक परीक्षा घेण्याचे शाळा व्यवस्थापण समितीने ठरविले आहे . त्या दृष्टीने शिक्षकांनी तयारी सुरू केली आहे . येत्या १० एप्रील पासून सर्व वर्गाची संकलीत मूल्यमापन चाचणी निश्चित केली आहे . यात शिक्षकांना नक्कीच यश प्राप्त होण्याची अपेक्षा वर्तवली आहे .सदर कार्याला गट शिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे हे संपूर्ण शिक्षण विभाग घेऊन उभे आहेत . त्यामुळे सर्व शिक्षकांना आणखी जास्त प्रेरणा मिळाली व जोमाने सर्व कामाला लागलो. शंकर रामलू केमेकार मुख्याध्यापक. तथा सर्व. शिक्षिका वृंद जि प शाळा मेहनत घेत आहे.
हे देखील वाचा: