अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील प्रेमला डॉक्टर, तर रायनाला अधिकारी व्हायचंय
मारेगाव येथील सामान्य कुटुंबातून आलेल्या दोन विद्यार्थ्यांची यशोगाथा
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील साखरा (कुंभा) येथे ग्रामीण भागात राहणाऱ्या व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून आलेला प्रेम विजय बच्चे या विद्यार्थ्यांने दहावीमध्ये (CBSC) 90.2% गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे. तर मारेगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेली रायना फिरोज खान ही कला शाखेतून प्रथम आली आहे. तिने 83.33% गुण मिळवले आहे. ग्रामीण भागात राहणा-या व सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
साखरा (कुंभा) येथील रहिवाशी असलेला प्रेम हा जवाहर नवोदय विधालय घाटंजी (बेलोरा) येथे CBSC मध्ये वर्ग 10 चा विद्यार्थी आहे. प्रेमचे वडील विजय बुच्चे यांचे कडे 5 एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. प्रेमच्या घरची परिस्थिती हलाखीची असताना या परिस्थितीवर मात करून त्याने दहावीमध्ये 90.2 टक्के गुण प्राप्त करत यश प्राप्त केले आहे. भविष्यात डॉक्टर बनून ग्रामीण भागात दवाखाना उघडून गोर गरीबांची सेवा करायची आहे असा मानस प्रेमने व्यक्त केला आहे.
रायना फिरोज खान ही कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची कला शाखेची 12 वी ची विद्यार्थीनी आहे. रायनाची घरची सामान्य आहे. तिचे वडील सिजनेबल व्यवसाय करतात. घरची परिस्थिती सामान्य असली तरी रायनाने 83.33% गुण मिळवुन कला शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनून देशसेवा करायची आहे, असा मानस रायनाने व्यक्त केला आहे.
रायना ने बारावी मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल मारेगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी नगर पंचायतचे आरोग्य सभापती मो. खालिद पटेल, ऍड. महेमुद खा. पठाण, डॉ. मुजफ्फर शेख, इकबाल सय्यद, उमर शरीफ, दिलदार शेख, हुसेन शेख, शेख फरीद, शेख खलील आदी उपस्थित होते.