मीदेखील वणीमध्ये शिक्षण घेतले- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

स्वामिनी कुचनकर हिच्या प्रकट मुलाखतीत केला बालशिक्षणाचा खुलासा

0

जितेंद्र कोठारी, वणी: माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रकट मुलाखत लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी स्वामींनी प्रशांत कुचनकर हिने चंद्रपूर येथे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेतून घेतली. यावेळी स्वामीनीने विचारलेल्या प्रश्नांना सुधीर मुनगंटीवार यांनी दिलखुलास उत्तरं दिलीत.

Podar School 2025

मुनगंटीवार म्हणालेत की, नागपूर, चंद्रपूर आणि वणीमध्ये त्यांनी दोन वर्ष शिक्षण घेतले. सध्याची राज्याची अर्थव्यवस्था ही नाजूक परिस्थितीमध्ये असून ती सुधारण्यास थोडा वेळ लागेल. महाराष्ट्राची किंवा देशाची प्रगती करायची असेल तर राजकारणातही यावे लागते. तरुणानीसुद्धा यात सहभागी व्हावे असे त्यांनी स्पष्ट केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्वामीनीने तुम्हाला मुख्यमंत्री बनायला आवडेल काय? या प्रश्नावरती बोलताना ते मनाले की मुख्यमंत्री हे पद मी किंवा कुणी एक व्यक्ती ठरवत नसते. स्वामीनीने घेतलेल्या मुलाखती दरम्यान आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुधीर भाऊंनी अतिशय शांत व संयमी व्यक्तिमत्त्वाचा परिचय दिला. स्वामीनीला व सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

वणीकरांसाठी ‘वरदान’ ठरणार जुनाडा ओव्हरब्रीज

 

Leave A Reply

Your email address will not be published.