गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

राजूर कॉलरी येथील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजूर येथील एका 27 वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाच्या काकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.

सुनील विजय पाईकराव (27) असे मृतकाचे नाव आहे. सुनील हा आपल्या आईसोबत राजूर कॉलरी येथे राहत होता. हा पेट्रोल पंपावर काम करीत असल्याची माहिती आहे. गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्याने आपल्या घरातच नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबतची माहिती सुनीलचे काका यांनी वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सुनीलला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याच महिन्यात त्याचा विवाह असल्याची माहिती आहे. घटनेचा तपास राजूर बिटचे जमादार डोमजी भादिकर करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या

हेदेखील वाचा

मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी तीन दिवस बंद

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.