रंगारीपुरा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जाच्या तणावामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगारीपुरा भागात राहणाऱ्या एका विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवार 24 सप्टें. रोजी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. आशिष किशोर तोडकर (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार आशिषचे वडील किशोर तोडकर हे नगर परिषद पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहे. मृत आशिष तोडकर याने काही वर्षांपूर्वी रंगनाथ नगर येथील एका मुलीसोबत प्रेमविवाह केले होता. त्याला 2 लहान मुली आहेत. आशिष हा कॅटरिंगचा व्यवसाय करायचा तसेच पेंटरकामे करूनही उपजीविका चालवीत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आशिषची पत्नी मोहरम या सणापासून माहेरी जाऊन होती. गुरुवारी रात्री आई, वडील आणि आशिष जेवण करून वेगवेगळ्या खोलीत झोपून गेले. शुक्रवारी सकाळी किशोर तोडकर हे नेहमीप्रमाणे पहाटे 4.30 वाजता उठले. थोड्यावेळाने त्यानी आशिषला हाक मारून उठविण्याचा प्रयत्न केले. मात्र आशिषच्या खोलीतून काही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा वडील किशोर तोडकर यांनी खोलीत डोकावून पाहिले असता किशोर हा छताला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

किशोर तोडकर यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना माहिती दिली. तेव्हा परिसरातील नागरिकांननी आशिषला खाली उतरविले. मात्र तो पर्यंत तो गतप्राण झाला होता. घटनेबाबत वणी पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली असून बातमी लिहेपर्यंत जमादार वासुदेव नारनवरे पंचनामा करीत होते.

मृतक आशिषच्या मागे आई, वडील, पत्नी व 2 मुली आहे. मृतक आशिषवर 20 हजाराचे कर्ज असून कर्जाच्या तणावात त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात आहे. मात्र आत्महत्या मागे नेमके कारण अद्याप कळू शकते नाही.

हे देखील वाचा:

Comments are closed.