गळफास लावून युवकाची आत्महत्या

मेघदूत कॉलनी येथील घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव ग्रामपंचायत अंतर्गत मेघदूत कॉलोनीमध्ये विवाहित युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवार 10 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता उघडकीस आली. दिनेश शंकर डोहे (32) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

शशिकांत शामराव घुमे रा. मेघदूत कॉलनी यांनी वणी पो. स्टे. येथे घटनेची फिर्याद दाखल केली. फिर्यादनुसार रविवारी रात्री 9.30 वाजता ते आपल्या घरात असताना शेजारील सुषमा शंकर डोहे यांनी हाक मारली. कारण विचारले असता तिने तिचा नवरा शंकर वरच्या खोलीत बंद असून आवाज देऊनही दार उघडत नसल्याचे संगितले.

त्यावरून फिर्यादी शशिकांत घुमे यांनी लात मारून दार उघडले असता शंकर यांनी सिलिंग पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतलेले दिसले. घटनेबाबत पोलिस स्टेशनला माहिती देऊन शंकरला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेबाबत वणी पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास एएसआय डोमाजी भादिकर करीत आहेत. शंकर यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

हेदेखील वाचा

मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...