सलग दोन आत्महत्येने हादरला मारेगाव तालुका

हटवांजरी व चिंचाळा येथे विष प्राशन करून आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यात 48 तासात दोघांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. यातील एक घटना ही मंगळवारी हटवांजरी येथे घडली तर दुसरी घटना ही बुधवारी चिंचाळा येथे घडली. दोघांनीही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून वणी उपविभागात सातत्याने आत्महत्येचे घटना घडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

पहिली घटना ही हटवांजरी (पोड) येथील आहे. मृतक अंकुश महादेव मडावी (40) हा काही मुळचा खापरी येथील रहिवासी होता. तो काही वर्षांपासून आपली सासुरवाडी असलेल्या हटवांजरी येथे राहत होता. मंगळवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास त्याने त्याच्या सासऱ्याच्या शेतात मोनोसिल नामक कीटकनाशक प्राशन केले. काही वेळाने काही शेतक-यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी अंकुशला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र रात्री उशिरा उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंकुशच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुसरी घटना ही चिंचाळा येथील आहे. भाऊराव थेटे (70) असे मृत इसमाचे नाव असून ते चिंचाळा येथील रहिवासी होते. त्यांनी बुधवारी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. विष प्राशन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. या दोन्ही घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

मंदिरात कार्यक्रमासाठी गेलेल्या भाविकेची पोत लंपास

Comments are closed.