एकाच दिवशी दोन आत्महत्या, सततच्या आत्महत्येने हादरला तालुका

नांदेपेरा येथे एका महिलेची तर डोर्ली येथे तरुणाची आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. नांदेपेरा येथे एका महिलेने तर डोर्ली येथे एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास या दोन्ही वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. सततच्या आत्महत्येने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. 

पहिली घटना ही नांदेपेरा येथील आहे. संगीता महेंद्र निखाडे (40) या नांदेपेरा येथील रहिवासी होत्या. त्या घरी तिचे पती व मुलासह राहत होत्या. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी सकाळी तिचे पती शेतात कामाला गेले होते. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास तिचा मुलगा हा घराबाहेर गेला होता. दरम्यान घरी कुणी नसल्याची संधी साधून संगिता यांनी गळफास घेतला.

मुलगा घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. त्याने याची माहिती वडिलांना दिली. वडील तात्काळ घरी पोहोचले. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. संगिता या मानसिक नैराश्यात होत्या. त्यांच्यावर याबाबत उपचार देखील सुरु होता. त्यातूनच यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दुसरी घटना ही तालुक्यातील डोर्ली येथील आहे. स्वप्नील प्रकाश आडे (24) हा डोर्ली येथील रहिवासी होता. मंगळवारी संध्याकाळी 6.30 स्वप्नीलने घरातील बैठक खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. स्वप्नीलने आत्महत्या का केली याची कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र मुलाने उचललेल्या या पावलामुळे त्याचे कुटुंबियांना धक्का बसला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

सततच्या आत्महत्यांनी हादरला वणी तालुका
तालुक्यातील सततच्या आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहे. या आठवड्यात आत्महत्येचा 5 ते 6 आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहे. यात तरुण मुलं हे आत्महत्येकडे वळत असताना दिसत आहे. यामुळे वणी तालुका हादरला आहे.

हे देखील वाचा; 

तेजापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

तरुणाची विष पिऊन आत्महत्या, लालगुडा येथे आढळला मृतदेह

Comments are closed.