सुजाता थिएटरमध्ये गुंजणार ‘हर हर महादेव’ची शिवगर्जना…..

दु. 12 ते 3 व दु. 3 ते 6 हे दोन शो हर हर महादेवचे.... संध्याकाळचे दोन शो बघता येणार रामसेतू

बहुगुणी डेस्क, वणी: केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि, या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे हर हर महादेव ही शिवगर्जना ! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी, महिमा हर हर महादेव या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उलगडला गेला आहे. हा चित्रपट वणीकरांना वणीतील सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीअस वातावरणात दोन शो मध्ये संपूर्ण फॅमिलीसह पाहता येणार आहे. त्यासाठी ऍडव्हांस बुकिंग सुरू झाली आहे. दुपारी 12 व 3 वाजता या सिनेमाचे दोन शो तर नंतरचे दोन शो रामसेतू सिनेमाचे होणार आहे. हर हर महादेव या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे.

बांदल सेनानायक बाजीप्रभू देशपांडे (शरद केळकर) यांचा स्वराज्यात सामील होण्याला आणि शिवाजी महाराजांना (सुबोध भावे) साथ देण्यासही विरोध असतो. त्यांच्यात काहीशी प्रत्यक्ष चकमकदेखील होते. हाच धागा पकडून पुढे ‘हर हर महादेव’ची पटकथा लिहिली गेली आहे. शूरवीर लढवय्या सेनानी रणांगणात तलवारीनं बाजी मारतो, पण, हा सेनानी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा असतो? त्याच्या समोर कोणत्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात? तो कोणत्या विवंचनेत असतो? या सगळ्याचं दर्शन सिनेमात आपल्याला घडतं. अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं बाजीप्रभू यांच्या पत्नीची भूमिका उत्तम केली आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.