विवेक तोटेवार, वणी: आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळा म्हटलं की, सगळ्यात जास्त पाण्याची आठवण येते. मग ही माणसाची असो की प्राण्यांची असो सारखीच असते. वणी शहराची तहान निर्गुडा नदी भागवत असते. मात्र उन्हाळ्याच्या तोंडावरच या नदीची धार कमी झाल्याचे जाणवत आहे. पुनवट, कवडशी, सावंगी या परिसरात नदी पात्राचे डबके झाले आहे. या डबक्यांमध्ये प्राणी बसतात. त्यामुळे हे पाणी मनुष्य असो की पशू कोणाच्याच कामात पडत नाही.
वणी, वाघदरा, मंदर, सारगाव, चारगाव, शिरपूर, शेलू, पुरड, पुनवट, नवेगाव, कवडशी, सावंगी आदी भागांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. नदीपात्रात अनेक पशू पाणी पितात. त्यामुळे या पशुंसोबतच पशुपालकांवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. म्हणूनच माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी हा प्रश्न केला आहे.
Comments are closed.