ज्योतिबा पोटे, मारेगाव: शिक्षक संघटनांची समन्वय कृती समिती यवतमाळ, तालुका मारेगाव यांचे वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषद शिक्षकावर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामाच्या बोज्यामुळे पं. स. मारेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले. अशैक्षणिक कामे कमी करावी अशी मगणी शिक्षकांची आहे. पुढील आंदोलन आता 9 ऑटोम्बर रोजी जिल्हा परिषद यवतमाळ येथे करण्यात येणार आहे.
शासन स्तरावरून करण्यात आलेल्या अहवालानुसार क्षेत्रिय अधिकार्यांचे शिक्षक, मुख्याध्यापकाचे ग्रुप बनवून त्यावर विविध आदेश दिल्या जात आहे. शासन शाळांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करुण देत नाही, मोबाईल आपली वैयक्तिक संपत्ती असून त्याचा वापर प्रशासकीय कामासाठी होत आहे. या ऑनलाइन कामाने शिक्षकांचे मानसिक स्वास्थ व कौटुंबिक जीवन हिरावल्या जात आहे, असा आरोप शिक्षकांनी केला आहे.
कधी, कोण, केव्हा? आपले वरिष्ठ कोणता आदेश देईल या बाबत काहीही सांगता येत नाही, शाळांना विद्युत पुरवठा, नेट कनेक्शन, कंप्यूटर, मोबाईल, रिचार्ज रेंज नसने, वीजेची कमतरता, प्रिंटर, स्कॅनर आदी सुविधा उपलब्ध नसताना पदर मोड़ करीत आज पर्यंत कामकाज करण्यात आले, सोबतच शालेय पोषण आहारासाठी लागणारी संपूर्ण साहित्यची खरेदी मुख्याध्यापकाने करून योजना चालवावी असा आदेश देण्यात आला आहे. शासनाने असे अनेक अशैक्षणिक कामे लादल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
यावेळी आंदोलनात तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे शिक्षक सहभागी होते. यात दिवाकर राउत, एस जी कळब्वे, एम.जी.मोडक, व्ही.बी.तेलरंदे, डीएस.दरेकर, जे.डी.खिरटकर, पि.जी.लोंडे, एच.ए.दरबेश्वर, रणजीत ठावरी, संजय फुलबंधे, चंद्रकांत सूखे, प्रकाश देवगड़कर, संजय आत्रम, गणेश फ़ुप्रे, नीलेश निचट, एमपी ठाकरे, बी.एम.चिव्हाने, धर्मराज सातपुते, गेधलाल वरकडे आदी शिक्षक सहभागी होते.