छातीत सुरा भोकसून मुलाने केली पित्याची हत्या

रक्तरंजीत घटनेने हादरले भेंडाळा गाव

0

सुशील ओझा, झरी: सततच्या घरगुती वादाला कंटाळून मुलाने पित्याच्या छातीत सुरा भोकसून हत्या केली. तालुक्यातील भेंडाळा येथे काल बुधवारी रात्री साडे 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. नत्थू केशव आसुटकर (50) असे मृतकाचे नाव आहे तर वैभव नत्थू आसुटकर (19) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी वैभवला आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणाने संपूर्ण गाव हादरले आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की मृतक नत्थू केशव आसूटकर (50) हे भेंडाळा येथील रहिवाशी होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाल्याने ती सासरी राहते. तर दुसरी मुलगी ही शिक्षणासाठी भद्रावती येथे राहते. सर्वात धाकटा मुलगा वैभव नत्थू आसुटकर (19) हा आई वडिलांसोबत गावात राहायचा. वैभव हा त्याच्या वडिलांसोबत शेती करायचा.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मृतक नत्थू यांना दारू पिण्याची सवय होती. दारू पिऊन आला की नत्थूचे नेहमी त्याची पत्नी व मुलासोबत भांडण व्हायचे. दरम्यान काल 19 मे रोजी संध्याकाळी घरगुती कारणावरून मृतक नत्थू व मुलगा वैभव यांचात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मुलाने वडील नत्थू यांच्या छातीत सुरा भोकसला. यात ते गंभीर जखमी झाले.

शेजा-यांनी जखमी नत्थूला एका कारमध्ये टाकून उपचारासाठी वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी मृतकाचे भाऊ जगन केशव आसुटकर यांच्या तक्रारीवरून आरोपी वैभव आसुटकर विरोधात भादंविच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी मुलगा वैभव आसुटकर याला सकाळी 7 वाजताच्या सुमारास अटक केली. प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक युवराज राठोड व जितेश पाणघाटे करीत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी गावाला घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाने संपूर्ण गाव हादरून गेले असून मुलाने जन्मदात्या पित्याविरोधात उचललेल्या या पावलाबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.