उत्पादन शुल्क निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप

तक्रारकर्ता परमानंद जयस्वाल यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: परवानाधारक मद्य विक्रीच्या दुकानातून ग्राहकांना घरपोच मद्य पोहचवण्याच्या ओळखपत्रासाठी व दुकान चालू ठेवण्यासाठी पांढरकवडा येथील राज्य उत्पादन शुल्काच्या निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी निरीक्षक जयंत जठार यांच्या विरोधात तालुक्यातील मार्डी येथील दारू दुकानदार परमानंद जयस्वाल यांनी थेट गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ब्रेक द चेन” अंतर्गत संचारबंदीत जिल्ह्यातील परवानाधारक मद्य विक्रीचे दुकानांना दुकान न उघडता ग्राहकांना मद्य घरपोच पोहचविण्याची सुविधा देण्याची मुभा असल्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी पारीत केले.

त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क पांढरकवडा कार्यालया मार्फत मद्य विक्रीच्या दुकानांतून ग्राहकांना मद्य घरपोच पोहचवण्यासाठी पास देण्यात येत आहे.

तालुक्यातील मार्डी येथील तक्रारकर्ता परमानंद जयस्वाल या व्यवसायिकाची मारेगाव, करंजी,मार्डी येथे पाच मद्य विक्रीची दुकाने आहेत. दुकानातून ग्राहकांना घरपोच दारू पोहचवण्याच्या सुविधेच्या ओळखपत्रासाठी पांढरकवडा येथे राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात गेले असता, निरीक्षक जयंत जठार यांनी एका दुकानाचे 50 हजार प्रमाणे 5 दुकानाचे अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला.

तक्रारकर्ता जयस्वाल यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने निरीक्षक जठार यांनी कागदपत्रे जयस्वाल यांच्यावर फेकून दिली व अपमानास्पद बोलून कार्यालयाबाहेर हाकलून लावले. असे जयस्वाल यांनी तक्रारीत म्हटले.

तक्रारकर्ता परमानंद जयस्वाल यांनी निरीक्षक जयंत जठार यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अप्पर सचिव, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, जिल्हा लाचलुचपत विभाग, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आदींकडे तक्रार दिली आहे. दरम्यान या प्रकरणी ‘वणी बहुगुणी’ने निरीक्षक जयंत जठार यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

बॅंक डिटेल्स व संपत्तीचीसुद्धा चौकशी करावी

राज्य उत्पादन शुल्काच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह मुंबईच्या मंत्र्यांना 20 लाख रुपये देऊन 6 महिन्यांपूर्वी मुंबईवरून पांढऱकवडा येथे आलो. मला आठवड्यातून विमानाने प्रवासाकरिता 10 हजार रुपये लागतात मी फुकटात काम करत नाही,असेही निरीक्षक जठार यांनी बोलल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. तसेच या प्रकरणी निरीक्षक जयंत जठार यांचे बॅंक डिटेल्स व संपत्तीचीसुद्धा चौकशी करावी अशी मागणीसुद्धा तक्रारकर्ता जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.

हेदेखील वाचा

छातीत सुरा भोकसून मुलाने केली पित्याची हत्या

हेदेखील वाचा

कुसुम नत्थूजी खानझोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 54 पॉझिटिव्ह, मंदर येथे 14 रुग्ण

 

Leave A Reply

Your email address will not be published.