कुसुम नत्थूजी खानझोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

आशा सेविका, ग्रा.प. व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभागी असलेले राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांची आई कुसुम नत्थूजी खानझोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फेसशिल्डचे वाटप करण्यात आले.

कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येणाऱ्या राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या या जोखमीच्या कामाची दखल घेत माजी ग्रा. प. सदस्य प्रवीण खानझोडे यांनी आईच्या स्मृतिदिनानिमित्त फेसशिल्डचे वाटप करून सर्व आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. ह्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ANM व आशा सेविका हजर होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक वानखडे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या पेरकावार,वृषाली खानझोडे, प्रवीण खानझोडे, डेव्हिड पेरकावार, सुभाष पेंदाम डॉ.चिखलीकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लिपटे यांनी केले.

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 54 पॉझिटिव्ह, मंदर येथे 14 रुग्ण

हेदेखील वाचा

मारेगावात आज 13 पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू

हेदेखील वाचा

अखेर मार्डी येथे 10 बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन

Leave A Reply

Your email address will not be published.