विवेक तोटेवार, वणी: शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी लावलेली बॅटरी अज्ञात चोरट्यांनी पळवली. वांजरी येथे आज बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बॅटरीची किंमत 10 हजार रुपये इतकी आहे.
सविस्तर वृत्त असे की रामा साधू काकडे हे वांजरी येथील रहिवाशी आहे. त्यांचे वांजरी गावाजवळच शेत आहे. परिसरात वन्य प्राण्यांचा वावर आहे. हे वन्य प्राणी शेताची नासधूस करतात. त्यामुळे त्यांनी प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सोलरवर चालणारी झटका मशीन सात महिन्यांआधी विकत घेतली होती.
झटका मशिनला लागणारी बॅटरी त्यांच्या शेतातील बंड्यात ठेवलेली होती. रोज संध्याकाळी ते बॅटरी सुरू करून घरी जायचे. मंगळवारी दिनांक 27 जुलै रोजी नेहमी प्रमाणे त्यांनी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान बॅटरी सुरू केली व ते घरी गेले.
आज बुधवारी दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान ते बॅटरी बंद करण्यासाठी शेतातील बंड्यात गेले. मात्र त्यांना तिथे बॅटरी आढळून आली नाही. दुपार पर्यंत त्यांनी बॅटरीचा शोध घेतला मात्र बॅटरी आढळून आली नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सपोउनि प्रभाकर कांबळे करीत आहे. सदर बॅटरीची किंमत 10 हजार आहे.
हे देखील वाचा: