जेवणासाठी धाबा शोधणा-या व्यक्तीला तिघांनी लुटले

तीन लुटारूंना एक दिवसाची पोलीस कोठडी

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 13 सप्टेंबर रात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील बाकडे पेट्रोल पंपाजवळ जेवणाकरिता बाहेर आलेल्या एका व्यक्तीला तिघांनी लुटले. याबाबतची तक्रार वणी पोलिसात दाखल करण्यात आली होती. वणी पोलिसांनी तत्परतेने तिन्ही आरोपींना अटक केली. मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की, हिंगणघाट येथून आलेले अनवस खा महेबूब खा पठाण हे आपल्या एका मित्रासोबत वणीला आले होते. रात्री उशिरा झाल्याने ते जेवणाकरिता बाकडे पेट्रोल पंपाजवळ सम्राट धाब्यावर आले. यावेळी जर्मन उर्फ शेख अमीर शेख महेबूब (27) रा. एकतानगर, सोनू उर्फ अतिक खान अमीर खान पठाण (29) रा. सिंधी कॉलनी व निखिल मुरलीधर किटकुले (30) रा. जटाशंकर चौक वणी यांनी मारहाण करीत अनवस यांच्या खिशातून 30 हजार रुपये व मोबाईल किंमत 21 हजार रुपये हिसकावून पसार झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याबाबत अनवस यांनी वणी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींवर कलम 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला. व तिन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता तिन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. दरम्यान हिंगणघाटवरून ते दोघे कशासाठी वणीत आले होते? शिवाय लुटल्यानंतर आरोपी तिथून पळून का गेले नाही? असे विविध प्रश्न या घटनेत उपस्थित होत आहे. 

हे देखील वाचा:

Comments are closed.