Breaking News: वाघाचा वेकोलि कर्मचा-यावर हल्ला, कामगार जखमी

निलजई खाणीतील घटना.... वाघ शिरला थेट खाणीच्या पार्किंगमध्ये,,,,

जितेंद्र कोठारी, वणी: निलजई येथील वेकोलिच्या खाणीत कर्तव्यावर असताना एका कर्मचा-यावर वाघाने हल्ला केला. आज संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात वेकोलि कर्मचारी जखमी झाला आहे. जखमीचे नाव केशव नांदे (56) रा. वासेकर ले आऊट वणी असे असून त्यांना आधी घुग्गुस व नंतर चंद्रपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

Podar School 2025

केशव बापूराव नांदे हे वेकोलिच्या निलजई ओपन कास्ट 2 या कोळसा खाणीत फिटर या पोस्टवर आहेत. आज मंगळवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी त्यांची सेकंड शिफ्ट (दु. 4 ते रा. 12) होती. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ते पार्किंग एरियामध्ये त्यांच्या सहका-यांसह कामात मग्न होते. दरम्यान वाघाने त्यांच्यावर मागच्या बाजूने हल्ला केला. हल्ला होताच त्यांनी आणि इतर कामगारांनी आरडोओरड केली असता वाघाने तिथून ढूम ढोकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या हल्ल्यात नांदे यांच्या मानेला व हातापायाला जखम झाली आहे. त्यांना तात्काळ घुग्गुस येथील वेकोलिच्या राजीव रतन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

आता कर्मचा-यांवर वाघाचा हल्ला
वणी तालुक्याच्या पूर्व दिशेला असलेल्या वेकोलि खाणीत वाघांचा वावर आहे. गेल्या महिन्यातच वाघाने कोलार पिंपरी परिसरात टॉवरचे काम करणा-या एका मजूरावर हल्ला केला होता. त्यात तो जखमी झाला होता. त्यांच्या काही दिवसानंतर वाघाने कोलेरा गावातील एका शेतक-याचा हल्ला करून जीव घेतला होता. आधी शेतातील मजूर व शेतक-यांवर वाघ हल्ला चढवायचे. मात्र आता वाघाने चक्क लोकांच्या कामाच्या ठिकाणी एन्ट्री करत हल्ला केला आहे. त्यामुळे वेकोलि कामगार व कर्मचारी चांगलेच दहशतीत आले आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.