सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडकोली गावाजवळ एका गीर गायीवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. रविवारी दुपार नंतर ही घटना घडल्याचा अंदाज आहे. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
अडकोली शेत शिवारात गट क्र. 88 येथे शेतकरी सुहास दादाजी नांदेकर रा. वणी यांच्या मालकीचे शेत आहे. त्यांच्याकडे गीर जातीच्या गायी आहेत. रविवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे त्यांच्याकडच्या गायी धु-यावर चरत होत्या.
संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास रखवालदार गोठ्यात गाडी बांधायला गेला असता त्यांना गाय दिसली नाही. त्यांनी जवळपास शोध घेतला पण गाय आढळून आली नाही. त्यावेळी मुसळधार पाऊस असल्याने ते घरी परत आले.
सोमवारी 20 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी गायीचा पुन्हा शोध घेतला असता. अडकोली शिवाराजवळच त्यांना गाय मृत अवस्थेत दिसली. गायीला अर्धेअधिक वाघाने खाल्ले होते. त्यांनी तातडीने याची माहिती शेतमालकाला दिली. घटनेची माहिती मिळताच पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.
या हल्ल्यात शेतमालकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर आहे. झरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात जनावरे ठार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.