जुणोनी शिवारात वाघाचा शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला

दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जुणोनी शिवारात वाघाने दोन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. जखमी शेतक-यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तालुक्यातील मांडवी येथील शेतकरी इंद्रदेव गंगाराम किनाके (29) यांची जुणोनी शिवारात शेती आहे. इंद्रदेव यांनी शेतात हरब-याचे पीक घेतले आहे. गुरुवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रात्री इंद्रदेव हा आपला नातेवाईक दिनेश बापूराव मडावी (22) याला शेतावर जागलीसाठी घेऊन गेला. सकाळी 7 वाजताच्या दरम्यान वाघाने या दोघांवर हल्ला केला. वाघाचा हल्ला झाल्याने या दोघांनीही मदतीसाठी याचना केली. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी लाठी काठी घेऊन आरडाओरड करत आले. आवाजामुळे वाघ शेतातून पळून गेला.

वाघाच्या हल्ल्यात इंद्रदेव व दिनेश हे दोघेघी गंभीर जखमी झाले. गावक-यांनी जखमी शेतकऱ्यांना गावात आणले व हल्ल्याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी गावात पोहोचले. अधिका-यांनी वनविभागाच्या गाडीत जखमींना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या दोघांवरही उपचार सुरु आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

जुणोनी परिसरात 5 वाघांचा मुक्त संचार आहे. ज्यामुळे वनविभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या देखरेखीखाली शेतकरी शेतात काम करीत आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहे. आजच्या वाघाच्या हल्याने शेतकऱ्यांत पुन्हा दहशत वाढली आहे.

हे देखील वाचा:

भाजप प्रज्ञा सेलच्या कार्यकारिणीवर वणीतील चौघांची वर्णी

मुरुमचे अवैधरित्या उत्खनन प्रकरणी 8.5 लाखांचा दंड

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.