सेवानिवृत्त शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे निधन

शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वडजापूर येथे अंत्यसंस्कार

0

जब्बार चीनी, वणी: विवेकानंद विद्यालय कायर येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे आज शुक्रवारी दिनांक 12 फेब्रवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान हदयविकाराच्या धक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. सध्या ते वणीतील महादेव नगरी येथे राहत होते.

अविनाश ठाकरे यांना सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्राची विशेष आवड होती. याशिवाय ते वडजापूर या गावचे सरपंच देखील होते. अनेक वर्ष त्यांनी पत्रकारिताही केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परीवार आहे.

अविनाश यांच्या पार्थिवावार आज संध्याकाळी 5 वाजता वडजापूर या त्यांच्या मुळ गावी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा:

जुणोनी शिवारात वाघाचा शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला

भाजप प्रज्ञा सेलच्या कार्यकारिणीवर वणीतील चौघांची वर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.