भास्कर राऊत, मारेगाव: मार्डीवरून वणीकडे जात असताना मार्डीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या फिस्की जंगलात एका वाहनासमोरच चक्क वाघ आला. अचानक वाघ समोर आल्याने वाहनधारकाची चांगलीच भंबेरी उडाली. वाघ निघून गेल्यानंतरच मग वाहनधारक वणीकडे गेले. ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना 4 मार्चला पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की वणी येथील मोहम्मद ताजीम आपल्या चारचाकी वाहनाने 4 मार्चला अमरावती गेले होते. वणी परतायला रात्र झाली होती. ते यवतमाळ वरून वडकी-मार्डी मार्गे वणीला पोहोचत होते. रात्री 3 वाजताच्या सुमारास जात असताना मार्डी जवळ असलेल्या फिस्की जंगलात अचानक त्यांच्या वाहनासमोर एक वाघ आला.
अचानक वाघ समोर आल्याने वाहनधारक आणि वाहनामध्ये असलेल्या प्रवाशांची चांगली मोठी भंबेरी उडाली. काही वेळ सर्वांचा श्वास थांबला होता. काही वेळ वाहन तेथेच थांबवल्या गेले. काही वेळानंतर उजव्या बाजूकडील डोल, वडगाव कडे असणाऱ्या जंगलात हा वाघ निघून गेला. ही घटना मोहम्मद ताजीम यांनी त्यांच्या मित्रांना सांगितली. त्यानंतर परिसरात याची चांगलीच चर्चा रंगली. जंगलातील वाघाच्या वास्तव्याने मार्डी व परिसरातील नागरिक दहशतीत आले आहेत.
हे देखील वाचा:
बॅटमन आलाये भेटीला…. सुजाता थिएटरमध्ये दु. 12.15 वा. रोज एक शो
Comments are closed.