घरकुल योजनेचा हप्ता न मिळाल्याने लाभार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ

35 लाभार्थ्यांना फटका, झरी नगरपंचायतीचा भोंगळ कारभार उघड

0
Mayur Marketing

सुशील ओझा, झरी: तालुक्याचे ठिकाण असून झरी ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले आहे. नगरपंचायत अंतर्गत झरी येथील 35 लोकांना एका वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. आवास योजनेचे घरबांधकामाची परवानगी सुद्धा नगरपंचायत तर्फे देण्यात आली. योजनेचे घरकुल बांधकाम बहुतांश लोकांनी सुरू केले. मात्र शासनाकडून अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता न मिळाल्याने लाभार्थ्यांना अर्धवट घरातच संसार करावा लागत आहे.

पंतप्रधान आवाज योजने अंतर्गत झरी येथील 35 लाभार्थ्यांना बांधकामाचा पहिला टप्पा 40 हजार देण्यात आला. त्यात घरकुल लाभार्थी यांनी स्लॅब लेवल पर्यंत बांधकाम केले. परंतु शासनाकडून दुसरा व तिसरा हप्ता न मिळाल्याने घराचे स्लॅब पडले नाही. ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांना छपराविना घरात राहावे लागत आहे. तर घराला छप्परच नसल्याने काही लाभार्थी भाड्याच्या घरात राहत आहे.

Lodha Hospital

पावसाळा सुरू असल्यामुळे उघड्यावर राहणाऱ्या लाभार्थीचे सर्प, विंचू इतर जलचर प्राण्यामुळे कुटुंबासह लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर लॉकडाऊन मुळे गोरगरीब जनतेजवळ काम नसल्याने घराचे भाडे देणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकतर रोजगार नाही, राहायला घर नाही, घराचे भाडे आणि त्यात शासनाने रोखलेले अनुदान यामुळे करावे काय अशा मनस्थितीत हे लाभार्थी आहेत.

घरकुल लाभार्थ्यांनी दुसरा हप्ता मिळावा या करिता उपोषण केले होते. उपोषण दरम्यान सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु ते अजूनही पूर्ण केले गेले नाही. झरी नागरपंच्यात अंतर्गत वॉर्ड क्र १७ मध्ये ९ घरकुल ४ मध्ये ३,५ मध्ये २, १६ मध्ये ४,१३ मध्ये २ व १२ मध्ये ३ घरकुल मंजूर असून हे सर्व लाभार्थी बांधकामाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने त्रस्त झाले आहे.

घरकुल लाभार्थी यांनी ३ मे २०१९ व २९ मे २०२० ला जिल्हाधिकारी व नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तक्रार देऊनही कोणताच उपयोग होत नसल्याची ओरड लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

नगरपंचायतमध्ये अध्यक्षासह १७ नगरसेवक असून आजूनपर्यंत कोणीही घरकुल लाभार्थ्यांकडे लक्ष देत नसून स्वतःच्या कामात खुश असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही घरकुल लाभार्थी यांनी शासनाचे पैसे मिळणारच या आशेने स्वतःजवळील असलेला पैसा खर्च करून बसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे दुसरा व तिसरा हप्ता न मिळाल्यास सर्व लाभार्थी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!