कोरोनाचा आज सिक्सर… घोन्श्यात 4, गणेशपूर व तेली फैलात 1-1

वणीत सुरू झाली कोरोनाची नवीन साखळी

0
Mayur Marketing

जब्बार चीनी, वणी: आज एकाच दिवशी घोन्सा येथे 4 रुग्ण व ड्रीमलॅन्ड सिटी गणेशपूर येथे 1 व तेली फैल येथे एक रुग्ण आढळून आला. विशेष म्हणजे घोन्सा येथील महिला उपचारानंतर निगेटिव्ह आल्याने तिला सुटी मिळाली होती. मात्र गावात आणखी 4 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर ड्रीमलॅन्ड सिटी येथील महिलेचा कोरोनाचा स्रोत न कळल्याने ही नवीन साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने वणीकरांसाठी ही एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल. तर तेली फैलात एका डॉक्टरचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे.

चिखलगाव येथे तेली फैल येथील एक महिला अंत्यसंस्कारात सामिल झाली होती. ती नंतर पॉजिटिव्ह निघाली होती. त्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेली घोन्सा येथील एक महिला पॉजिटिव्ह आढळून आली होती. ती महिला पॉजिटिव्ह वरून निगेटिव्ह आली आहे. मात्र त्याच कुटुंबातील आणखी 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. त्या सर्वांना आज घोन्सा येथून वणी येथील कोविड केअर सेन्टरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Lodha Hospital

वणीत कोरोनाची नवीन साखळी
वणी शहरा लगत असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीत येणा-या ड्रीमलॅन्ड सिटीमधली एक महिला पॉजिटिव्ह आली आहे. आज घेण्यात आलेल्या रॅपिट ऍन्टिजन टेस्टमध्ये ही महिला पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला आधीच्या कोणत्याही साखळीतील रुग्णाच्या संपर्कात न आल्याने ही नवीन साखळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर तेली फैल येथील एक डॉक्टर पॉजिटिव्ह आले आहे. मात्र त्या डॉक्टरांची प्रॅक्टिस सध्या बंदअसल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

आज 10 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. त्यात 1 व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे. तर घोन्सा येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी 4 व्यक्तींचे रिपोर्ट आज पॉजिटिव्ह आले. तर तेली फैलातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे. कालपर्यंत वणीत कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 41 होती. त्यात आज 6 रुग्णांची भर पडल्याने ही संख्या 47 झाली आहे. यातील 38 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून त्यातील 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

सध्या 7 व्यक्ती ऍक्टिव्ह असून त्यातील 6 व्यक्ती वणीतील कोविड केअर सेन्टरमध्ये तर एक व्यक्तीवर यवतमाळ येथे जीएमसी येथे उपचार सुरू आहे. सध्या वणी शहरात 2 कन्टेन्मेंट झोन असून 5 कन्टेन्मेंट झोन ग्रामीण भागात आहेत. सध्या घोन्सा येथील 4 पुरुष, तेली फैल येथील 1 पुरुष, व गणेशपूर (ड्रीमलॅन्ड सिटी) येथील 1 महिला पॉजिटिव्ह आहेत.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!