खाणीतील कोळसा वाहतूक दोन तास ठप्प

धूळ आणि प्रदूषणाने नागरिक त्रस्त

0

अमोल पानघाटे साखरा (कोलगाव): खाणीतील कोळसा वाहतुकीच्या धुळीने आणि प्रदुषणाने साखरावासी त्रस्त झाले. शेवटी नागरिकांनी खाणीतील कोळसा वाहतूकच दोन तास ठप्प केली. वणी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पैंनगंगा, मुंगोली खुल्या कोळसा खाणी आहेत.

या खाणीतून निघणारा कोळसा हा घुगुस येथे रेल्वे सायडिंगवर ट्रकणे नेला जातो. तो साखरा गावाजवळून जाते. या कोळशाची बारीक धूळ हवेत पसरत आहे. याबद्दल साखरावासियांनी क्षेत्रीय प्रबंधक अधिकारी ताडाळी ऊर्जाग्राम यांना निवेदन दिले.

रोज पाणी मारण्यात यावे. ट्रकवरती ताडपत्री टाकण्यात यावी असे  या निवेदनात म्हटले होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. साखरा गावातील लोकांना मोठया प्रमाणात कोळसाच्या धुळीचा सामना करावा लागतो. तसेच कोणत्याही  प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. म्हणून शेवटी गावातील नागरिकांना कोळसा वाहतूक ठप्प केली. शनिवार दिनांक ३१।१०।२०२० ला रोज शनिवारचा सायंकाळी पाच वाजेपासून  पैंनगंगा कोळसा खाणीची कोळसा वाहतूक दोन तास ठप्प करण्यात आली.

जो पर्यंत रोडवर पाणी मारणार नाही. तोप्रयत्न कोळसा वाहतूक करू देणार नाही. असा पवित्रा गावातील नागरिकांनी घेतला होता. मात्र पैंनगंगा कोळसा खाणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक यांनी घटनास्थळी धाव घेतली. रोज पाणी मारण्यात येईल,

तसेच रोडवरील संपूर्ण कोळशाची धूळ साफ करण्यात येईल असे सांगितले. कोळसा वाहतूक पुन्हा सुळळीत करण्यात आली. या वेळी शांताराम उपासे, महेश कुचनकर, छबन पानघाटे, निखिल उपासे, रामदास गोरे, स्वप्निल उपासे, गावातील समस्त नागरिकांनी सहकार्य केले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.