गाडेघाट येथील अंगणवाडी सेविकेची त्वरित बदली करा
संतप्त ग्रामपंचायत सदस्य, ग्रामवासी व पालकांची वरिष्ठांकडे तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गाडेघाट येथील अंगणवाडीत गावातील लहान मुले शिकत आहे. परंतु या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेचे पती येऊन हस्तक्षेप करीत असून राजकारण करतो व जनतेला धमकी देतो. याशिवाय अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना पोषण आहार वेळेवर मिळत नाही त्याबाबत पाल्यानी अंगणवाडी सेविकेला विचारणा केली असता अंगणवाडी सेविका ही उद्धट भाषेत बोलते व पालकांना शाळेत येण्यास मज्जाव करते.
पाल्याना अंगणवाडीत प्रवेश नसुन कुणीही अंगवाडीत आले तर तुमच्या डोळ्यात तिखट टाकून मारिन अशी धमकी देत असल्याची तक्रार आहे.
2 ऑगस्ट रोजी ग्रा.प.सदस्य रमेश दोरशटवार यांनी अंगणवाडी सेविकेला शिक्षण घेत असलेल्या मुलांचे शासनाकडून पैसे आले की नाही याबाबत विचारपूस केली असता त्याच रात्री अंगणवाडी सेविकेचे पती रमेश दोरशटवार यांचे घरी जाऊन भांडणतंटा केली व धमकी दिली.
त्यावेळी गावातील विठ्ठल मुके तेथे आले असता त्यांना सुद्धा अंगणवाडी सेविकेच्या पतींने मारहाण केली. याबाबत ची तक्रार मुके यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला दिली. अश्या प्रकारे अंगणवाडी सेविकेचे पती वेळोवेळी गावात येऊन हस्तक्षेप करून लोकांना धमकी देतो असा आरोप गावकरी करीत आहे.
अंगणवाडी सेविका ही लिंगटी येथील रहिवासी असून अंगणवाडी सेविका म्हणून गाडेघाट येथे नोकरीला आहे. अंगणवाडीत शिकत असलेल्या मुलांचा पोषण आहार वाहनाने येतो .परंतु हे पोषण आहार गाडेघाटला न उतरवीता लिंगटी येथे उतरविले जाते.
याबाबत ग्रा.प.सदस्य, उपसरपंच, गावकरी व ग्रामसेवक असे मिळुन अंगणवाडी मध्ये जावून विचारपूस केली असता अंगणवाडी सेविकेने उडवाउडवीची उत्तरे दिले व विचारपूस करणाऱ्या लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनला खोटी तक्रार दिली.
वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः येऊन पाहणी करून चौकशी करावी व दोषी असलेल्या अंगणवाडी सेविका विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा गावतीक एकही मुलगा अंगणवाडीमध्ये शिकण्याकरीता पाठविणार नाही अशी ठाम भूमिका समस्त ग्रामवसी व ग्रामपंचायतने घेतली असून तशी तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत 5 ऑगस्ट रोजी मुलांचे पालक देविदास तुडमवार, श्रीनीवास गंभिर बरपटवार ,विकास दादाजी पवार , राहुल रमेश दोरशरवार , दिपक अनंदराव घाना , विश्वास गंभिर बरपटवार, राहुल विठ्ठल , महेश अडल्लु तिपानवार तसेच ग्रामपंचायत सदस्य ईश्वरी गुरुप्रकाश राजगडकर ,गजानन काळे, रमेश दोरशरवार,मनीषा भोयर, शाईना श. सेबुर शेख लक्ष्माबाई मंचलवार ,भूमन्ना म्याकलवार यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व पर्यवेक्षिका यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
हे देखील वाचा:
वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू