रवी सेल्स एजन्सीजचा स्थानतरण सोहळा संपन्न

एकजुट हेच यशाचे गमक: मुकुंद जवंजाळ, एचपीसीएल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी शहरातील सुपरिचित असलेल्या रवि सेल्स एजन्सीज या एचपी गॅसच्या प्रतिष्ठानाचा स्थानांतरण सोहळा पार पडला. यावेळी एचपीसीएलचे डीजीएम मुकुंद जवंजाळ व एचपीसीएलचे एएसएम विशाल सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजय मुकेवार होते. तर नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर हे यावेळी प्रमुख पाहुणे होते.

रवि सेल्स एजन्सीजला 40 वर्ष पूर्ण केल्या झाल्याच्या निमित्ताने या स्थानांतरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होता. गांधी चौक येथील जुन्या प्रतिष्ठानाच्या शेजारील नवीन वास्तूमध्ये रवि सेल्स एजन्सिजचा स्थानांतरण सोहळा पार पडला. 40 वर्षे यशस्वी कार्य करण्यात सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, व्यवस्थापक, कॉम्प्युटर ऑपरेटर, सिलेंडर वाटप करणारे,गोडावून किपर,व इतर सहकार्याबद्दल कर्मचऱ्याचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले

एकजुट हेच यशाचे गमक: मुकुंद जवंजाळ, एचपीसीएल
एकजुटीने व आपण सर्व काम करत असल्याने आज आपण घरोघरी एच.पी.गॅस पोहचवू शकलो. यापुढे देखील असेच कार्य केले जाईल असे मत एचपीसीएलचे मुकुंद जावंजाळ यांनी व्यक्त केले. तसेच स्थानांतरण सोहळ्याच्या निमित्ताने संचालकांना शुभेच्छा दिल्या. 

उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मनोगतात रवी सेल्स एजन्सीज च्या आता पर्यंतच्या कार्या बद्दल कौतुक करीत पुढील वाटचाली करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक रवि निखार यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रेयश निखार यांनी मानले.

हे देखील वाचा:

राम मुडे यांना पीएचडी

ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली

Comments are closed.