एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांची बदली

कामठीचे एसडीपीो संजय पुजलवार होणार वणीत रुजू

0

जब्बार चीनी, वणी: वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांची बदली करण्यात आली आहे. बुधवारी रात्री गुह विभागाने याबाबत आदेश काढला आहे. वणीत आता कामठी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार हे रुजू होणार आहे.

बुधवारी रात्री उशिरा गृहविभागाने पोलीस विभागातील अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात अपर अधिक्षक व उपविभागीय दर्जाच्या अधिका-यांचा समावेश आहे. यात यवतमाळचे अपर अधिक्षक नरुल हसन यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी खंडेराव धरणे यांना नियुक्त करण्यात आले आहे.

वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या जागी कामठी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांना नियुक्त करण्यात आले आहे. पुजलवार हे आधी यवतमाळ येथे कार्यरत होते. तिथे त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी पदी पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी उमरखेड येथेही उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे.

पांढकरवडा येथील उपविभागीय अधिका-यांची बदली
पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांची खामगाव येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव येथील प्रदीप पाटील रुजू होणार आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.