वणी-मुकुटबन मार्गावर कायरजवळ ट्रक पलटी

वाहतूक ठप्प, नागरिकांना त्रास, पर्यायी मार्गाचा वाहतुकीस वापर

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-मुकुटबन मार्गावरील कायर गावालगतच्या सैदाबाद फाट्याजवळ एक ट्रक पलटी झाला. आज शनिवारी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. एक सिमेंट वाहून नेणारा ट्रक (RJ 57-G A 0195) रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आज शनिवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास एक ट्रक सिमेंट भरून वणीच्या दिशेने येत होता. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने कायर लगत सैदाबाद फाट्याजवळ ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली. या अपघातामुळे वणी-मुकुटबन मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तर अपघाताची माहिती मिळताच बघ्यांची देखील घटनास्थळी एकच गर्दी झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सकाळच्या वेळीच वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. वृत्त लिहे पर्यंत (दुपारी) वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. रस्ता बंद झाल्याने अनेकांनी साखरा (दरा) व रासा (घोन्सा) या मार्गाने पर्यायी प्रवास करावा लागत आहे, यात प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. 

Comments are closed.