वणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त

नगर पालिकेसमोरील कृषी केंद्रावर धाड, संचालकाला अटक

0

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांनी वणी येथील एका कृषी केंद्रात धाड टाकून तब्बल पावणे दोन लाखांची बनावट कीटकनाशकं जप्त केले. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून वणीतील कृषी केंद्र संचालकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे व त्यांच्या पथकांने 20 डिसें. रोजी नगर परिषद समोरील विवेकानंद कॉम्प्लेक्स येथील बोढे कृषी केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान कृषी अधिकाऱ्यांना दुकानात विक्रीसाठी उपलब्ध इमामेक्टीम बेंझोयट 5℅ ओक्लेम ब्रॅण्ड नावाची कीटकनाशक औषधी बनावट असल्याचा संशय आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कृषी अधिकाऱ्यांनी सदर कीटकनाशकांचे 1 किग्रा., 500 ग्राम, 250 ग्रामचे 1 लाख 85 हजार किमतीची औषध जप्त केली. जप्त किटकानाशाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. लॅबच्या अहवालामध्ये कीटकनाशक औषधीमध्ये सक्रिय घटक अत्यल्प प्रमाणात असल्याचे नमूद करण्यात आले.

त्यावरून कृषी अधिकारी जि. प. यवतमाळ राजेंद्र वसंतराव माळोदे यांनी 4 जानेवारी रोजी बोढे कृषी केंद्रचे संचालक सुनील बीजाराम बोढे विरुद्द वणी पो.स्टे. मध्ये शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करुन बनावट औषध विक्री केल्याची तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनील बीजाराम बोढे (35 वर्ष) रा. रांगणा, ता. वणी यास अटक केली. आरोपीविरुद्ध कलम 420 भा.दं.वि. सहकलम कीटकनाशक अधिनियम- 1968, कीटकनाशक नियम – 1971 अनव्ये गुन्हा दाखल केला. पुढील तापसकामी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागविण्यात येणार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वैभव जाधव करीत आहे.

हे देखील वाचा:

हे देखील वाचा: 

Leave A Reply

Your email address will not be published.