शाहबुद्दीन अजानी यांचा MDRT लाईफटाईम मेंबरशीपने सन्मान

लाईफटाईम मेंबरशीप मिळालेले विभागातील पहिले व एकमेव विमा अभिकर्ते

0

जब्बार चीनी, वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC), वणी शाखेचे विमा अभिकर्ते शहाबुद्दीन अजानी यांना मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनतर्फे लाईफ टाईम मेंबरशीप प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागात लाईफटाईम मेंबरशिप हा सन्मान मिळालेले ते पहिले आणि एकमेव विमा अभिकर्ते आहे. याशिवाय सलग 12 वर्षे एमडीआरटी सन्मान मिळण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. हा देखील आपल्या परिसरातील एक विक्रमच आहे.

आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. यात जगभरातील विमा एजेंट्स या सेमिनारला येतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. विमा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अमेरिकेच्या प्रतिष्ठित मिलीयन डॅालर राऊंड टेबल कॉन्फरन्सला शहाबुद्दीन अजानी हे तीनदा उपस्थित झाले आहे. 

लाईफटाईम मेंबरशीप कुणाला मिळते?
सलग 12 वर्षांपासून शहाबुद्दीन अजाणी यांना एमडीआरटी सन्मान मिळाला आहे. त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील त्यांनी पूर्ण केली आहे. सातत्याने उत्कृष्ट परफॉरमन्स, संमेलनाला नियमित हजेरी तसेच एमडीआरटी रजिस्ट्रेशन इत्यादी प्रक्रिया पूर्ण केलेल्या एमडीआरटी सन्मान प्राप्त सदस्यांनाच लाईफटाईन मेंबरशीप प्रदान केली जाते.

अमरावती विभागात लाईफटाईम मेंबरशीप मिळणार शाहबुद्दीन अजाणी हे पहिले आणि एकमेव अभिकर्ते ठरल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबाबत एलआयसीचे शाखा अधिकारी प्रकाश झलके, विकास अधिकारी बी.बी. विटाळकर व शाखेच्या कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबाबत अजानी यांनी सर्व विमा ग्राहक व मित्र परिवाराचे आभार मानले.

हे देखील वाचा: 

निवडणुकीचा अत्यल्प दरात करा आपला किंवा आपल्या पॅनलचा प्रचार

हे देखील वाचा: 

सुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड

हे देखील वाचा: 

वणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त

Leave A Reply

Your email address will not be published.