पुरुषोत्तम नवघरे, वणी: लग्नाकार्यासाठी मंदिरात गेलेल्या एका इसमाची दुचाकी चोरीला गेली. शहरातील वासेकर ले आऊट येथे ही घटना घडली. याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये दुचारी चोरांची दहशत निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की घन:शाम बापुराव जुमळे (43) हे वणीतील दामले नगर येथील रहिवासी असून ते मजुरी करतात. त्यांनी 5 वर्षांपूर्वी ऍक्टिव्हा 4 जी (MH29 BH6035) ही मोपेड विकत घेतली होती. ते त्यांच्या रोजच्या कामासाठी या दुचाकीचा वापर करायचे. दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी ते वासेकर ले आऊट येथील एका मंदिरात लग्नासाठी गेले होते. त्यांनी मंदिराच्या बाहेर दुचाकी लावली व लग्नकार्यासाठी ते मंदिरात गेले.
संध्याकाळी 5 वाजता लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यावर ते घरी परत जाण्यासाठी गाडीजवळ आले असता त्यांना ठेवलेल्या ठिकाणी गाडी आढळून आली नाही. त्यानी आजूबाजूला दुचाकीचा शोध घेतला शिवाय काही लोकांना विचारपूस केली. मात्र गाडीबाबत काहीही माहिती त्यांना मिळाली नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.