वाचन प्रेरणा दिनानिमित्त नगर वाचनालयातर्फे सोमवारी विविध कार्यक्रम

व्याख्यान, गप्पाटप्पा, वाचन व पाठांतर स्पर्धा आदी उपक्रम १५ ऑक्टोबर रोजी

0

बहुगुणी डेस्क, वणी: येथील नगर वाचनालय वणी तर्फे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नगर वाचनालयात सकाळी 9 वाजता वाचकांशी हितगुज करून त्यांच्याशी गप्पा मारत ‘ वाचाल तर वाचाल ‘ हा विषय सुनील इंदूवामन ठाकरे हे मांडणार आहेत.

दुपारी 1 ते 3 या वेळात नगर वाचनालयातर्फे एस.पी.एम. विद्यालयात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाचन स्पर्धा व पाठांतर स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता पांढरकवडा येथील गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य विजय देशपांडे हे एस.पी.एम. विद्यालयात ‘ वाचन संस्कृती ‘ या विषयावर व्याख्यान देणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना वणीकर नागरिकांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती नगर वाचनालयातर्फे करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.