तालुका प्रतिनिधी, वणी : शिंदोला येथील माजी सरपंच वसंतराव जगन्नाथ काळे यांचे दि.16 शनिवारला सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते.
एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जनमानसांत ओळख होती. त्यांच्यावर दुपारी शिंदोला येथे अंत्यसंस्कार झालेत. त्यांच्या मागे मुलगा किशोर, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा बराचसा आप्त परिवार आहे.
एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं जनसामान्यात विशेष स्थान होतं. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा