विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू

सर्वांचे लाडके मुस्तफा 'मामू' यांचा दुर्दैवी मृत्यू

0

विवेक तोटेवार, वणी; तालुक्यातील जत्रा रोडवर मदिना दूध डेरीचे मालक गुलाम मोहम्मद मुस्तफा वय (48) राहणार वागदारा (नवीन) यांचा इन्व्हर्टरचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी 4:30च्या दरम्यान ही घटना घडली.

आज दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान वीज गेली असता मुस्तफा हे आपल्या जत्रा रोडवरील दूध डेरीमध्ये इन्व्हर्टरचा वायर जोडत होते. त्याच वेळी उघडा वायर हातात असतानाच अचानक वीज आली. काही कळण्याच्या आत त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर  वणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

वणीकरांची दुधाची गरज भागवणारे म्हणून ओळख असलेले मुस्तफा हे शहरात मुस्तफा मामु या नावाने  ओळखले जायते. वणीत ज्यावेळी दुधाची कमतरता होती त्यावेळी मुस्तफा यांनी वरोरा येथून दूध आणून वणीकरांची दुधाची मागणी पूर्ण केली.

काही वर्षानंतर त्यांनी वणीतच स्वतःचे म्हशी पालन व गाय पालन करून दुधाचा व्यवसाय केला. शांत व प्रामाणीक व्यक्तिमत्त्व म्हणून मुस्तफा यांची ओळख होती. ग्राहकांना कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नसल्याचा विश्वास त्यामुळे त्यांनी व्यवसायात अल्पावधीतच जम बसवला.

शहराच्या दुसऱ्या टोकावरूनही ग्राहक त्यांच्याकडे दूध खरेदीसाठी यायचे. काही काळ त्यांनी फावल्या वेळात मिरवणुकीत नाचविण्यात येणाऱ्या घोड्याचेही पालन केले होते व वणीतील अनेकांना घडसवारीचे प्रशिक्षण देण्याचे काम ही केले.

12 महिने रोजा ठेवणारी व्यक्ती
मुस्तफा हे धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. मुस्लिम समाजात रोजा म्हणजे उपवास करण्याला अधिक महत्व आहे. मुस्तफा हे गेल्या 15 वर्षांपासून वर्षभर रोजा ठेवत असल्याचे बोलले जाते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उद्या गुरुवारी त्यांची दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.