पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील संत जगनाडे चौकात विदर्भ तेली महासंघाच्या वतीने संत जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. समाजबांधवांच्या उपस्थितीत संतांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष रवी बेलुरकर होते. प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते गजानन कासावार यांनी संत जगनाडे महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी समाजबांधवांना संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ तेली महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष डंभारे व माजी नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे उपस्थित होते.अध्यक्ष व अतिथींनी समयोचित प्रतिक्रिया व्यक्त करत समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद तराळे यांनी केले.
जयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विजय पिपराडे, देवेंद्र गोबाडे, शंकर पाटिल, गोपाल पाटील, पंढरी बोरपे, गजानन उपाते, विलास डवरे, आशिष डंभारे, प्रशांत निमकर, प्रणव पिंपळे, विलास निमकर, आकाश शिरसागर, संगिता सहारे, उमेश गंधारे, नथ्थूजी टाफरे, राहुल दांडेकर, वाघ साहेब, संकेत गंधारे, देवेंद्र डवरे यांनी परिश्रम घेतले.



Comments are closed.