ग्रामीण रुग्णालय समोरील वॉटर एटीएम जळून खाक
सकाळी लागली भीषण आग, नागरिकांचा स्वच्छ पाण्याचा आधार गेला
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन बिल्डिंग समोरील रोडवर असलेल्या व्हॉटर एटीएमला आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. लक्षात आले. आग लागताच फायर ब्रिगेडला याची माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेडची टीम तातडीने आग विझवण्यासाठी पोहोचली. काही वेळातच आग विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर व्हॉटर एटीम जळून खाक झाले. या व्हॉटर एटीएमचा परिसरातील नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी मोठा आधार होता. हे एटीएम जळाल्याने परिसरातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. व्हॉटर एटीएम कधीपर्यंत लावण्यात येणार याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, छोटू नीमकर यांनी भेट दिली. यावेळी बघ्याची एकच गर्दी झाली होती. ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.


Comments are closed.